Monday, August 29, 2011

आज मी माझ्या ब्लॉगर मित्रांसाठी एक छान युक्ती सांगणार आहे. ब्लॉगवरील नविन लेख, विचार, महत्त्वाची माहीती, बातमी किंवा वाचकांच्या चटकन लक्षात यावा असा कोणताही मजकुर दर्शविण्यासाठी एक "फिरता फळा" ब्लॉगवर कसा बनवायचा ते आज आपण पाहुया.







वरीलप्रमाणे फिरता फळा बनविण्यासाठी ब्लॉग पोस्ट मध्ये "EDIT HTML" मध्ये किंवा "Add page element" मध्ये "Add HTML/JAVASCRIPT" मध्ये खालील कोड चिकटवावा. आणि पोस्ट किंवा page element सेव्ह
करावे

.

आपल्या सोयीनुसार या स्क्रीप्टमध्ये खालीलप्रमाणे बदल देखिल तुम्ही करु शकता. marquee direction="up" - यामध्ये मजकुराची दीशा बदलण्यासाठी "up" च्या जागी "down" किंवा "side" असे लिहिता येते. scrollamount="1" - मजकुराची गती वाढवण्यासाठी "1" च्या जागी "2","3","4" अशी संख्या वाढवत न्यावी. height="100px" - फिरत्या फळ्याचा आकार कमी-जास्त करण्यासाठी या संख्येमध्ये बदल करावा. bgcolor="#ffffff" - फिरत्या फळ्याचा रंग बदलण्यासाठी "#ffffff" च्या ऐवजी दुसरा HTML कलर वापरावा.

 

How to change blogger template?


आज या लेखापासुन मी ब्लॉगरबद्दल सवीस्तर माहीती देणार्‍या लेखमालिकेची सुरुवात करीत आहे. ब्लॉगर्सना उपयुक्त ठरेल अशी ब्लॉग (Blogger/blogspot) बद्दल सर्व माहीती वाचकांना या लेखमालीकेद्वारे पुरवीण्याचा माझा मानस आहे. "ब्लॉगची टेम्प्लेट कशी बदलावी?" या पासुन मी लेखमालीकेला सुरुवात करीत आहे.


ब्लॉग टेम्प्लेट म्हणजे काय?

ब्लॉग किंवा वेब साईट एका ठरावीक साच्यामध्ये मांडलेली असते. ब्लॉगमध्ये लेख कोठे असणार, विषयसुची, जाहीराती, नावे, परीशीष्टे इत्यादी वेबसाइटवर कोठे आणि कसे दीसणार याची मांडणी टेम्प्लेटमध्ये केलेली असते. अगदी फाँट्सचा रंग आणि आकार देखील टेम्प्लेटमध्ये ठरवलेला असतो.
ब्लॉगर्.कॉम आपल्याला काही टेम्प्लेट्स पुरवीते. या टेम्प्लेट्सना क्लासीक टेम्प्लेट्स असेही म्हंटले जाते. क्लासीक टेम्प्लेट वापरणे बर्‍याच ब्लॉगर्सना आवडत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे क्लासीक टेम्प्लेट्समुळे ब्लॉगचे स्वतंत्र अस्तीत्व निर्माण होत नाही. आणि आपला ब्लॉग इतर अनेक ब्लॉगपैकी एक बनुन जातो.


पण जर कोणाला क्लासीक टेम्प्लेटपैकीच एखादी टेम्प्लेट आवडली असेल तर ती टेम्प्लेट कशी वापरावी ते आपण पाहुया -

1. ब्लॉगर्.कॉम मध्ये लॉग्-इन करा.

2. तेथे Layout चा ऑप्शन दीसेल. त्यावर क्लिक करा.

3. ले-आउट मध्ये पुढीलप्रमाणे चार पर्याय दीसतील - Page Elements , Fonts and Colors, Edit HTML and
choose new template

4. त्यापैकी "Choose new template" वर क्लिक करा.

5. इथे तुम्हाला क्लासीक टेम्प्लेट्स चे सर्व उपलब्ध पर्याय दीसतील.

6. त्यापैकी तुमचा आवडता पर्याय निवडा आणि "Save template" चे बटण दाबुन नविन टेम्प्लेट सुरक्षीत करा.

7. आता तुम्ही नवीन टेम्प्लेटने सुसज्ज ब्लॉग पाहु शकता.

आता आपण ब्लॉगर टेम्प्लेट्स बद्दल चा महत्त्वाचा आणि रंजक भाग पाहुया. नविन टेम्प्लेट बाहेरुन आणुन (इंटरनेटवरुन) आपल्या ब्लॉगवर कशी जोडावी ते पाहुया. पण त्याआधी ब्लॉगर टेम्प्लेट्सबद्दल काही अधीक माहीती जाणुन घेउया.


नविन ब्लॉगर टेम्प्लेटची काय आवश्यकता? -

याचे उत्तर सोपे आहे. आपला ब्लॉग वेगळा आणि सर्वात उठुन दिसावा यासाठी तसेच काही प्रगत सुविधांचा वापर करता यावा यासाठी नविन ब्लॉगर टेम्प्लेटची आवश्यकता भासते.


ब्लॉगरच्या टेम्प्लेटचे विविध प्रकार कोणते?-

ब्लॉगर टेम्प्लेटचे बरेच प्रकार आहेत. साधारणपणे ब्लॉगचा रंग, स्तंभ (Colomns) , आकार आणि रचना यावरुन ब्लॉग टेम्प्लेट्सचे प्रकार ठरवले जातात. माझ्या मते कॉलम्स (colomns - स्तंभ) ची संख्या हा ब्लॉग टेम्प्लेट्स निवडण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.


ब्लॉगरच्या टेम्प्लेट्स कोठे मिळवता येतील?

मोफत ब्लॉगर टेम्प्लेट्स उपल्ब्ध करुन देणार्‍या हजारो वेब साइट्स इंटरनेटवर उपल्ब्ध आहेत. गुगलसर्च केल्यास त्यांची यादीच समोर येइल. वाचकांसाठी मी पहील्या पाच साईट्सची (माझ्यामते) नावे सुचवीत आहे

-Mashable's Top 70 blogger templates

-http://www.eblogtemplates.com/

-Templates4all

-FreeTemplates

-http://btemplates.com/


आपल्या ब्लॉगसाठी सर्वोत्तम टेम्प्लेट कशी निवडावी?

- यासाठी ३क रुल लक्षात ठेवा. म्हणजेच कलर, कॉलम्स आणि कस्टमर. या तीन "क' चा विचार करुनच आपली टेम्प्लेट निवडा.

- जर तुम्ही अ‍ॅडसेन्स (जाहीराती) आणि इतर गॅजेट्स वापरणार असाल तर ३ कॉलम्स असलेली टेम्प्लेट वापरा.त्यामुळे तुमच्या ब्लॉग प्रोफेशनल वाटेल.

- जर ब्लॉग साधा आणि सोपा दिसावा असे वाटत असेल तर २ कॉलम्स असलेली टेम्प्लेट निवडा.

- पण १ कॉलम किंवा ४ कॉलम्स असलेली टेम्प्लेट शक्यतो निवडु नका.एका कॉलम मुळे ब्लॉग अगदीच साधा दीसेल आणि चार कॉलम्समुळे ब्लॉग एकदम किचकट दीसेल.

आता तुम्हाला टेम्प्लेट्स बद्दल बर्‍यापैकी माहीती झालेली आहे असे गृहीत धरुन, ब्लॉग टेम्प्लेट कशी बदलावी याबद्दल सांगतो.

1. पहील्यांदा तुम्हाला आवडलेली टेम्प्लेट इंटरनेटवरुन संगणकामध्ये डाउनलोड करुन घ्या.

2. डाउनलोड केलेली टेम्प्लेट .xml प्रकारची असेल. जर ती rar किंवा .zip प्रकारची असेल तर त्यातुन .xml फाइल वेगळी काढुन घ्या ( extract it to a folder, so that you can access .xml file in it)

3. आता ब्लॉगर्.कॉम वर जाउन लॉग्-इन करा.

4. आणि Layout > Edit HTML वर क्लिक करा

5. येथे browse and upload चा पर्याय दीसेल. 
6. Browse बटणाच्या सहाय्याने संगणकात जेथे टेम्प्लेट डाउनलोड केलेली आहे तेथे जाउन .xml फाइल
सीलेक्ट करा

7. आता Save बटण दाबुन तुम्ही केलेले बदल सीलेक्ट करा.
आता तुमचा ब्लॉग तुमच्या आवडत्या टेम्प्लेटने सजलेला दीसेल