तुमचा कॉम्प्युटर हळू [ Slow ] चालत असल्यास ?
बर्याच वेळा आपला कॉम्प्युटर स्लो झाला आहे व तो पूर्वी चांगला फास्ट चालायचा पण आता हळू चालतो असे वाटते.
कॉम्प्युटर हळू चालणे किंवा स्लो होणे ही खरी गोष्ट आहे. आपल्या कॉम्प्युटरमध्ये बरेच सॉफ्टवेअर / प्रोग्राम्स टाकल्यामूळे आपला कॉम्प्युटर स्लो होतो असे सर्वांना वाटते. परंतु या व्यतिरीक्त इतर अनेक कारणांमूळे आपला कॉम्प्युटर स्लो होऊ शकतो.
कॉम्प्युटर मधिल अनेक अनावश्यक गोष्टी आपला कॉम्प्युटर स्लो करतात. आपल्या कॉम्प्युटरचा वेग [ Speed ] व्यवस्थित ठेवण्यासाठी खाली काही गोष्टी सांगितल्या आहेत.
१) कॉम्प्युटरमध्ये नेहमीच अनावश्यक तात्पुरत्या फाईली [ Temporary Files ] तयार होत असतात. खास करुन इंटरनेट वापरल्यास कॉम्प्युटरमध्ये अशा अनावश्यक अनेक फाईली तयार होतात. कॉम्प्युटर मधिल 'डिस्क क्लिनअप' [ Disk Cleanup ] ह्या प्रोग्रामद्वारे अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करता येतात.
Start - Programs - Accessories - System Tools मधिल Disk Cleanup वर क्लिक केल्यास चालू होणाऱ्या चौकोनात [ C/D: ] निवडून OK करावे. त्या नंतरच्या चौकोनात निरनिराळ्या विभागात असलेल्या अनावश्यक फाईलींनी व्यापलेली जागा दाखविली जाते. इथे पुन्हा 'OK' वर क्लिक केल्यास कॉम्प्युटर त्या सर्व विभागातील अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करतो. साधारण दर आठवड्याने अशा प्रकारे अनावश्यक फाईली नष्ट कराव्या.
Monday, January 21, 2013
चांगले व उत्तम सॉफ्टवेअर्स मोफत कुठे मिळतील ?
डाऊनलोड.कॉम (www.download.com) ही सर्व प्रकारचे सॉफ्ट्वेअर्स शोधण्यासाठी चांगली वेबसाईट आहे.
निरनिराळ्या प्रकारे अनेक सॉफ्ट्वेअर्स आपण www.download.com वर शोधू शकता . इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये www.download.com वेबसाईट उघशल्यास सुरवातीलाच पहिल्या पानावर वरच्याबाजूस शोधण्यासाठी व्यवस्था केली आहे या जागे मध्ये आपण आपणास हवे असलेल्या सॉफ्टवेअचे नावच नाही तर त्या एवजी त्या संबंधीत एखादा शब्द अथवा वाक्य जरी टाईप करुन ते शोधले तरी हि वेबसाईट त्या शब्दाशी अथवा वाक्याशी संबंधीत सॉफ्टवेअर शोधुन देते.
उदाहरणार्थ एखादी फाईल डिलिट केल्यानंतर ती 'रिसायकल बीन' (Recycle Bin) मध्ये जाते तर तेथून ही डिलिट केल्यानंतर ती कॉम्प्युटर मधून कायमची नष्ट होते . आता समजा अशा प्रकारे तुमच्या हातुन चुकून 'रिसायकल बीन' मधून देखिल डिलिट झालेली फाईल जर तुम्हाला परत मिळवायची असेल तर www.download.comवेबसाईट्वर आपण 'Recycle Bin Recovery' असे शोधल्यास हि वेबसाईट या शब्दाशी संबंधीत सॉफ्टवेअर्स शोधुन त्यांची यादी समोर ठेवतो. अशा प्रकारे आपण आपणास हव्यात्या सॉफ्ट्वेअर्स संबंधीचे शब्द टाईप करुन त्यावरील सॉफ्टवेअर्स शोधू शकता.
डाऊनलोड.कॉमवर सॉफ्टवेअर्स कसे शोधावे आणि कसे डाऊनलोड करावे याची क्रिया खाली दिली आहे.
१. इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये www.download.com सुरु करा.
Subscribe to:
Posts (Atom)